पुरेशी झोप निरोगी राहण्यासाठी पर्याप्त विश्रांती आणि झोपेची आवश्यकता असते. प्रत्येकाने रात्री सात ते आठ तासांची शांत झोप अनुभवायलाच हवी. अन्यथा बरेचसे दुष्परिणाम बघायला मिळतात. तणाव, हृदयरोग, डिप्रेशन, मधुमेह, उच्च रक्तदाब, जाडी वाढणे अथवा अन्य तक्रारीशी कमी झोप हा विषय निगडित आहे. झोप अपूर्ण असेल तर कार्टीसोल नामक संप्रेरकाचा स्तर वाढतो. वजनवाढीवर याचा थेट परिणाम होतो. पुरेशी झोप घेतली नाही तर रक्तातील शर्करेच्या प्रमाणात असंतुलन निर्माण होण्याचा धोका असतो. यामुळेच मधुमेहाची शक्यता वाढते. कमी झोप हा कर्करोगाला कारक ठरणाऱ्या पेशींच्या वाढीशी संबंधित ठरणारा घटक आहे. कमी झोपेमुळे शरीरातील विषारी रसायनं बाहेर टाकण्यात अडथळा उत्पन्न होतो आणि कर्करोगाचा धोका बळावतो. कमी झोप हे विस्मरणाचं एक महत्त्वाचं कारण आहे. दिवसभर मेंदूवर ताण असतो. मेंदू पूर्ण कार्यक्षमतेनं काम करत असतो. अशा वेळी रात्रीदेखील विश्रांती मिळाली नाही. भारतीय
पुरेशी झोप ही हवीच